सोमय्या स्वत: कंपनी शिपायांच्या घरी गेले अन् लाखो रुपये लाटले – संजय राऊत

 

मुंबई | भाजपा नेते किरीटी सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे अशातच संजय राऊत दिवसेंदिवस सोमय्यांवर नवनवे आरोप करत आहेत. सोमय्या विरुद्ध राऊत या वादात आज राऊतांनी पुन्हा एकदा सोमय्यांविरोधात नवा आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी मोतीलाल ओसवाल कंपनीकडून लाखो रुपये त्यांच्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतले, असा नवा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांविरोधात ट्विट्सची मालिका सुरू केली आहे. यात आज संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठानवर सलग तिसऱ्यांदा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी केल्या तीन दिवसांपासून किरीट सोमय्यांविरोधात ट्विटरवर आरोपांची मालिका सुरू केली आहे. यात राऊत यांनी मुख्यत्वे किरीट सोमय्यांशी निगडीत युवक प्रतिष्ठानला येणाऱ्या निधीवर बोट ठेवत गंभीर आरोप केले आहेत.

 

“किरीट का कमाल: ३. किरीट सोमय्या यांनी NSEL ची ५६०० कोटी शेअर्सच्या घोटाळ्यासंदर्भात ईडीकडे चौकशीची मागणी केली. मोतीलाल ओसवाल कंपनीची याप्रकरणी ED ने चौकशी केली. स्वत: किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनी शिपायांच्या घरी गेले होते. तमाशा केला. २०१८-१९ असे दोन वर्ष सोमय्याने मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्याच्या युवाक प्रतिष्ठानसाठी घेतले”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

Team Global News Marathi: