इतका भ्रष्टाचार माजवला तर तपास यंत्रणा तुमची कॉलर पकडणारच – सदाभाऊ खोत

 

मागील काही दिवसांपासून सीबीआय, ईडी, एनसीबी यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केलेल्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सामने बघायला मिळत आहे. तसेच अनेक मंत्र्यावर सुद्धा केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई करण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

 

यासंदर्भात सदाभाऊ खोत यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’तुकाराम सुपे, वाझे, परमबीर, अमिताभ गुप्ता, सीताराम कुंटे असे अनेक अधिकारी सर्रास घोटाळे / वसुली करताय. पण बदनामी होते ती CBI, ED, NCB च्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची जे महाराष्ट्रात गुन्हेगारी थांबवण्याचा प्रयत्न करताय’, असे खोत म्हणाले.

तसेच पुढे बोलताना खोत म्हणाले की,’इतका भ्रष्टाचार माजवला तर तपास यंत्रणा तुमची कॉलर पकडणारच अशी टीका त्यांनी केली होती. आता खोत यांच्या या टीकेला महाविकास आघाडीचे नेते काय प्रतिउत्तर देतायत हे पहावे लागणार आहे.

Team Global News Marathi: