“.तर भाजपाला समर्थ पर्याय द्यायच्या बाता कुणी करू नयेत”,

 

मुंबई | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर राष्ट्रीय स्तरावर भारतीय जनता पक्षविरोधात आघाडी उभी करण्याच्या चर्चांना वेग आला आहे. त्यातच रास्तवराडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही त्याला दुजोरा दिल्यामुळे प्रत्यक्ष आणि पडद्यामागे घडामोडी सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे.

मात्र, शिवसेनेकडून यावर तीव्र शब्दांमध्ये आक्षेप घेण्यात आला आहे. “देशात काँग्रसच्या नेतृत्वाखाली यूपीए आहेच कुठ? असा सवाल ममता बॅनर्जींनी विचारला. यूपीए नाही तसा एनडीएही नाही. मोदींच्या पक्षाला एनडीएची गरज नाही, पण विरोधकांना यूपीएची गरज आहे, यूपीए समांतर दुसरी आघाडी स्थापन करणे हे भाजपाचे हात बळकट करण्यासारखेच आहे”, अशा शब्दांत शिवसेनेनं निशाणा साधला आहे.

त्यातच विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व कुणी करावं, यावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेनेनं सामनामधील अग्रलेखातून तोंडसुख घेतलं आहे. “काँग्रेसला विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा दैवी अधिकार प्राप्त झालेला नाही, असं ऐतिहासिक विधान तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत किशोर करतात. दैवी अधिकार कुणालाच प्राप्त होत नाही. यूपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाचा ते येणारा काळच ठरवेल. आधी पर्याय तर उभा करा”, अशा शब्दांत शिवसेनेनं विरोधकांना ऐकवलं आहे.

Team Global News Marathi: