छोट्या उद्योगांच्या मदतीसाठी एमएसएमई मंत्री नारायण राणे यांचा पुढाकार

 

नवी दिल्ली | राष्ट्रीय लघूउद्योग महामंडळ 10 हजार कोटी रुपयांचा आत्मनिर्भर निधी उभारणार आहे. यासाठी केंद्रीय एमएसएमई अर्थात सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांना विकास निधी मिळविण्यात येत असलेल्या अडचणीवर उपाययोजनेसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी आत्मनिर्भर पॅकेज दिले आहे.

या अंतर्गत या उद्योगांना दिल्या जाणाऱ्या निधींसाठी एका रकमेची घोषणा केली. त्यासाठी भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या एनएसआयसी अर्थात राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ या मिनी-रत्न महामंडळाची 100% उपकंपनी असणाऱ्या एनव्हीसीएफएल या कंपनीची स्थापना करण्यात आली. एमएसएमई उद्योगांना विकास भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी निधी उभारण्यास मदत करण्याच्या उद्देशाने आणि 10,006 कोटी रुपयांचा लक्ष्यित निधीसह एनव्हीसीएफएलने आत्मनिर्भर निधीची स्थापना केली आहे.

यावेळी राणे यांनी अधिकाऱ्यांना ठामपणे बजावले की या क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली हवी आहे. त्यासाठी मंत्रालयाच्या सर्व विभागांना समन्वयाने काम करावे लागेल. समाजाचे भले करण्यासाठी मंत्रालयाने अधिक खर्च करायला हवा असे ते म्हणाले. एमएसएमई क्षेत्राच्या माध्यमातून भारताच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते आणि त्यातून अधिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न गाठणे शक्य होईल याकडे राणे यांनी लक्ष वेधले.

एनएसआयसी, एनव्हीसीएफएल आणि एसएलव्ही यांच्या अधिकाऱ्यांच्या योगदान करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय एमएसएमई राज्यमंत्री भानूप्रताप सिंग वर्मा, एमएसएमई मंत्रालयाचे सचिव बी बी स्वेन, एनएसआयसीच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि एनव्हीसीएफएलच्या अध्यक्ष अलका अरोरा आणि एसव्हीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष के.सुरेश या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Team Global News Marathi: