चप्पलफेक प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचा राष्ट्रवादीला जोरदार टोला

 

मुंबई | पिंपरी चिंचवडमध्ये आज भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मोठा वाद पाहण्यास मिळाला. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल फिरकावण्याचा प्रकार घडला. पण, ‘पुतळ्याच्या उद्घाटनाचे आणि अटलजींच्या कार्यक्रमाला विरोध होत असेल तर त्यांची बुद्धी तपासून पाहावी लागेल’ अशा शब्दांत फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये पालिकेकडून करण्यात आलेल्या विकास कामांचा उद्घाटन सोहळा पार पडला. पण, राष्ट्रवादीने ही सगळी काम अर्धवट झाली असल्याचा आरोप करत कडाडून विरोध केला होता. राष्ट्रवादीच्या या विरोधावर फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर आपल्या शैलीत घणाघाती टीका केली होती.

‘भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत चांगल्या प्रकारे काम होत आहे. राष्ट्रवादी प्रत्येक ठिकाणी आंदोलन करत आहे. पण त्यांची सत्ता होती त्यावेळी त्यांनी स्वत: काही केलं नाही. तसंच, ‘मराठा आरक्षणासाठी ज्या आण्णासाहेब पाटील यांनी आपले सर्वस्व पणाला लावले, त्यांनी आपला जीव पणाला लावला आणि बलिदान दिले. त्या अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचे आणि अटलजींच्या कार्यक्रमाला विरोध होत असेल तर त्यांची बुद्धी तपासून पाहावी लागेल’, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

Team Global News Marathi: