सिंधुदुर्गात राणेंना झटका, २ नगरसेवकांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश

 

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे राज्यातील वातावरण खूपच तापले होते. तुटत राणेंना अटक त्यानंतर सुटका त्यामुळे सेना-भाजपा यांच्यातील संघर्ष अख्या महाराष्ट्राला पाहायला मिळाला होता. त्यातच आता राणेंना सेनेने आणखी एक धक्का दिला आहे. सिंधुदुर्गातील राणे समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

देवगड नगर पालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकरू आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. देवगडच्या दोन नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधल्यामुळे राणेंना हा मोठा झटका मानला जात आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर पलटवार करत येड्यांची जत्रा अशी उपमा दिली आहे. प्रवेशानंतर राणेंनी ट्विट करून सेनेला चिमटा काढला आहे.

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत आणि आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. तसंच कणकवलीच्या माईन आणि कालमठ ग्रामपंचायतीवर निवडून आलेले सरपंच धनश्री मेस्त्री आणि प्रज्ञा मिस्त्री यांचाही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला होता.

Team Global News Marathi: