“सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षांच्या दालनातून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढून नितीश राणेंचा फोटो”

 

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष निवडीनंतर राणे-ठाकरे वाद पुन्हा उफाळून येताना दिसून येणार आहे. जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनात लावण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे, सोनिया गांधी, शरद पवार यांचे फोटो हटवण्यात आले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा असलेला फोटो हटवून त्याठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा फोटो लावण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे मनीष दळवी यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी भाजपचेच अतुल काळसेकर विजयी झाले. निवडणुका पार पडल्या असल्या तरी अद्यापही ठाकरे आणि राणे यांच्यातील वाद मात्र थांबायचं नाव घेत नाहीय.नवनिर्वाचित अध्यक्ष मनीष दळवी हे नारायण राणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी अध्यक्ष मनीष दळवी आणि उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांचं अभिनंदन केलं आहे.

शिवसेना आणि नारायण राणे यांच्या वादात मोठ्या प्रतिष्ठेची केलेल्या निवडणुकीत राणेंनी जिल्हा बँकेत पुन्हा सत्ता मिळवली. निवडणुकीत ११ विरूद्ध ८ अशा फरकाने भाजपने सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला.जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कणकवलीत झालेल्या संतोष परब हल्ला प्रकरण राज्यभर गाजलं. त्यामुळे जिल्हा बँकेच्या मतमोजणीकडे राज्याचे लक्ष लागलं होतं. मात्र भाजपनं जिल्हा बँकेवर वर्चस्व मिळवलं.

Team Global News Marathi: