शिवसेनेच्या शिवबंधन आणि प्रतिज्ञापत्राच्या खेळीला एकनाथ शिंदे गटाकडून सडेतोड प्रतिउत्तर

 

एकनाथ शिंदे गटाने महाविकास आघाडीला सुरुंग लावत राज्यात भाजपसोबत सत्तास्थापन केली. शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेचं राजकीय अस्तित्व धोक्यात आलं. या सर्व सत्तासंघर्षापासून ते आतापर्यंत एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेत राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय. सेना आमदारांनी बंडखोरी केली.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र मागितलं. शिवसेनेच्या या खेळीला शिंदे गटाकडून जशास तसं उत्तर देण्यात आलंय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात समर्थकांनी शपथपत्र मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे.

मोठ्या प्रमाणात शिंदे गटाला पाठिंबा असलेले कार्यकर्ते आणि समर्थक हे शपथपत्र भरण्यासाठी गर्दी करतायेत. शिवसेना जिल्हा पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याचे प्रतिज्ञा पत्र आज भरून देत आहेत. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम इथेच हे प्रतिज्ञा पत्र भरून दिले जात आहेत.

ठाणे महापालिकेतील सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी त्यासाठी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि न्यायालयीन लढाई जिंकण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र महत्त्वाचे मानले जात आहे.

दोन मुलांना घरात सोडून १५ वर्षाच्या प्रियकरासोबत पळून गेली आई

मंत्रिमंडळ विस्तारासाठी आता मोर्चे काढावे लागतील, सतेज पाटलांचा शिंदे सरकारला इशारा

 

Team Global News Marathi: