नेमबाज मोनाली गोऱ्हे अनंतात विलीन, सकाळी वडील आणि दुपारी तिचे कोरोनामुळे निधन

नाशिक : सध्या संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यात रुग्णसंख्या सुद्धा झपाट्याने वाढून अनेकांना आपला प्रम गमवावा लागत आहे, आज तागायत सामान्य नागरिकांसह राजकीय पुढारी, सेलिब्रिटी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यातच आज नाशिकमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घटना घडल्यामुळे जोरदार धक्का बसला आहे.

भारतीय युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक व श्रीलंकेच्या नेमबाज संघाचे प्रशिक्षक मोनाली गोऱ्हे यांचं कोरोनामुळे दुर्दैवी निधन झालं आहे. काही दिवसांपूर्वी मोनाली गोऱ्हे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता तसेच त्यांच्या बरोबर त्यांचे वडीलही पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज सकाळी मोनाली यांचे वडील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर मोनाली यांच्यावरही उपचार सुरू असताना दुपारी त्यांच्या वडिलांपाठोपाठ त्यांचाही कोरोनाने घात केला. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळी वडील आणि दुपारी मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने परिसरामध्ये नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. नाशिक शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये दोघांवरही उपचार सुरू होते. त्या दरम्यानच अचानक तब्येत खालावल्याने सकाळी मोनाली गोऱ्हे यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तर दुपारी मोनाली गोऱ्हे यांनी आपला प्राण गमावला.

Team Global News Marathi: