“शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आम्हाला.” शिंदे गटाच्या आमदारच मोठं विधान

 

शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे पक्षाचे निवडणूक चिन्ह नेमके कोणाला मिळणार यावरून सध्या शिंदे आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात सध्या कायदेशीर युद्ध सुरू आहे. याबाबत सध्या निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. शुक्रवारी दोन्ही गटांच्या दाव्यावरील युक्तीवाद पूर्ण झाला आहे. असे असतानाच निवडणूक आयोगाने याबाबतच्या सुनावणीला ३० जानेवारीची तारीख दिली आहे. त्यातच आता शिंदे गटातील नेते संतोष बांगर यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदावर कोणाला पाहायला आवडेल यावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

संतोष बांगर यांनी, “शिवसेनेच्या पक्षप्रमुखाची निवड केली जाणार आहे. या निवडीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे यांना पाहायला आवडेल,” असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्ष तसेच धनुष्याबाण या निवडणूक चिन्हावर शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोघांनीही मालकी सांगितली आहे. याबाबत दोन्ही पक्षांनी निवडणूक आयोगासमोर आपला युक्तीवाद मांडला आहे. याबाबतचा युक्तीवाद पूर्ण झाला असून आयोगाने थेट निकाल न देता ३० जानेवारी ही पुढील तारीख दिली आहे. ३

मात्र येत्या २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुखपदाचा कार्यकाल संपणार आहे. याच कारणामुळे ठाकरेंचा कार्यकाल संपल्यानंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुख या पदावर कोण असणार यासाठी चर्चा होत आहेत. निवडणूक आयोगाने निकाल दिला असता तर हा पेचच निर्माण झाला नसता. मात्र आयोगाने ३० जानेवारी ही सुनावणीची तारीख दिल्यामुळे कायदेशीदृष्ट्या या पदावर कोण राहणार? याची चर्चा रंगताना दिसत आहे.

शिवसेनेच्या पक्षघटनेमध्ये पक्षप्रमुखांची नियुक्ती नेमकी कोण करणार? याविषयी निश्चित अशी नियमावली नमूद करण्यात आली आहे. त्यानुसार, शिवसेनाप्रमुख हे पक्षाचे अध्यक्ष असतील. त्यांची निवड ही पक्षाच्या प्रतिनिधी सभेकडून केली जाईल. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील निवडक सदस्य प्रतिनिधी सभेवर असतात. पक्ष प्रमुखांची निवड पाच वर्षांसाठी केली जाते.

Team Global News Marathi: