‘शिवसेना संपायला उद्धव आणि आदित्य ठाकरेच जबाबदार,आता शिवसेना कदापि उभी राहणार नाही’

सावंतवाडी – शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून, मुख्यमंत्री असताना त्याना सरकार वाचवता आले नाही.यांच्या सारखे दुर्देव ते काय आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी जोरदार टीका केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केली. तसेच सतत सरकार पडणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचे सांगत शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ माणसाने पाडायची भाषा न करता अभिनंदन करावे, असे ही राणे म्हणाले.

केंद्रिय मंत्री राणे हे गोव्यावरून कणकवली कडे जात असताना सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,संजू परब,अजय गोंदावले, लखम सावंत भोसले,बड्या कोरगावकर, मनोज नाईक, आनंद नेवगी,दिपाली भालेकर,उत्कर्षा सासोलकर,बंटी पुरोहित आदि उपस्थित होते.

राणे म्हणाले,मुख्यमंत्री असतना आमदार खासदार यांना न भेटणे मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे करून ठेवणे यामुळेच ठाकरे यांच्या बाबतचा रोष निर्माण झाला असून,त्यामुळेच हे आमदार फुटले आहेत संजय राऊत यांनी शिवसेनेला मागे न्याचे काम केले आहे.ठाकरे यांना मातोश्री दिसायचे आणि राणे यांना टार्गेट करणे हाच त्याचा एकमेव उद्देश होता.असे ही राणे म्हणाले पण मी सांगितल्या प्रमाणे हे सरकार कोसळले असल्याचे त्यांनी सांगितले.
आता महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करीत असून नवनवीन प्रकल्प राज्यात येतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हेच चांगले कम करतील असा आपणास विश्वास असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळेल असे म्हटले होते त्यावर भाष्य करतना राणे यांनी महाराष्ट्र सतत सरकार कोसळत राहिले तर विकास कसा होणार राज्याच्या हिताचे नाही.त्यामुळे पवार यांनी कधी तरी चांगले बोलावे असा टोला लगावला.

Team Global News Marathi: