शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवले, उद्धवजी तुम्ही तर तेही विसरलात

 

५ ऑक्टोबरला शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी तर उद्धव ठाकरे गटाचा शिवाजी पार्क येथे पार पडला. यात दोघांनीही एकमेकांवरती जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे ( यांनी आपल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे व त्यांच्या लहान मुलावर टीका केली. दीड वर्षांच्या रुद्रांशवर टीका केल्याने वडील खासदार डॉ श्रीकांत शिंदेसह अनेकांनी त्याचा निषेधही केला.

आता यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीदेखील भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, “शिवरायांनी महिलांचा सन्मान करायला शिकवले, तुम्ही तर तेही विसरलात.” अशी टीका वाघ यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केली आहे. चित्रा वाघ ट्विट करत म्हणाल्या, “पद वाटताना ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ पाळणारे बिचाऱ्या दीड वर्षांच्या कोवळ्या जीवाला राजकारणात ओढतात. महाराष्ट्राचे राजकारण इतक्या खालच्या स्तरावर कधीच गेले नव्हते. ज्यांनी नेले त्यांचा जितका निषेध करावा तितका कमी आहे.” असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

“जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद स्विकारण्याची वेळ आली. तेव्हा शिवसैनिक सोडून मुख्यमंत्रिपद स्वतःकडे घेतले. मुख्यमंत्री झाल्यावर शिवसैनिक सोडून पक्षाध्यक्षपदही स्वतःकडेच ठेवले. शिवसैनिक सोडून आपल्या मुलाकडे मंत्रिपद दिले. एखादी महिला शिवसैनिक सोडून घरातच आपल्या पत्नीकडे संपादकपद दिले. ते एकनाथ शिंदेंच्या नातवावर टीका करत आहे.” असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

Team Global News Marathi: