शिवरायांबद्दलच्या ‘त्या’ विधानात देवेंद्र फडणवीसांना काहीच चुकीचं वाटत नसेल तर…”

 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक विधान केले. त्या विधानावरून बाद निर्माण झाला आहे. त्यांच्या ते विधान म्हणजे छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षातील नेतेमंडळींनी केला आहे. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी केलेल्या त्या विधानाचा चुकीचा अर्थ घेतला जात असून ते छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे वक्तव्य नव्हते, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. त्यावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली.

“देवेंद्र फडणवीस म्हणतात की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत असतील. पण त्याच वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराजांबद्दल केलेल्या निंदनीय विधानात त्यांना काहीही चुकीचे दिसत नाही, हे अतिशय धक्कादायक आणि घृणास्पद आहे,” अशा शब्दांत क्रास्टो यांनी फडणवीसांवर टीका केली.

क्रास्टो पुढे म्हणाले की, “फडणवीसांकडून हा दुटप्पीपणा का होतोय? फक्त स्वतःच्या लोकांना वाचवण्याकरता असं केलं जातंय का? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा वापर भाजपा नेते केवळ मते मिळवण्यासाठी करत आहेत आणि उद्देश साध्य झाल्यानंतर महाराजांचा त्यांना सोयीस्करपणे विसर पडत आहे,” असा आरोपही क्रास्टो यांनी केला.

“महाराजांचा अवमान करणाऱ्यांना संरक्षण देऊन देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावत आहेत. त्यांनी तसे करणे टाळावे अन्यथा महाराष्ट्राचे राज्यपाल आणि भाजपाचे प्रवक्ते यांच्या विधानांशी ते सहमत आहेत, असा त्याचा अर्थ होईल.

Team Global News Marathi: