शिवप्रेमाचे नवे ढोंग! भाजपा हा किती तोंडी नाग?”

 

छत्रपतींचा अपमान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी करूनही त्यांच्या धमन्या थंडच आहेत व ज्यांनी उसळून तलवार काढली आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले भाजपचे शिवराय प्रेम हे ढोंग असल्याचे सिद्ध होते” असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सामनातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.छत्रपतींचा अपमान राज्यपाल कोश्यारी, राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी व राज्याचे पर्यटनमंत्री लोढा यांनी केला. यावरून पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. तसेच विखे पाटलांवर देखील निशाणा साधण्यात आला आहे.

“महाराष्ट्राच्या राज्यपालांपासून मंत्र्या-संत्र्यांपर्यंत प्रत्येकजण स्वतःस महामहोपाध्याय किंवा शिवशाहीर असल्याच्या आविर्भावात डफावर थाप मारीत आहे, पण ही लोणकढी थापच म्हणावी लागेल! विखे पाटील हे कधीकाळी मर्दमऱ्हाठे मावळे म्हणून शिवरायांचे भक्त होते. आज भाजपात जाऊन त्यांना शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचे गुणगान करावे लागते. वीर मराठय़ांचा हा देश आहे या कल्पनेस यामुळे धक्का बसतो. एकंदरीत भाजपचे शिवप्रेमाचे ढोंग रोज उघडे पडत आहे. त्यामुळे छत्रपती उदयन राजे म्हणतात तेच खरे की, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर कसे राहू शकतात?’ हा निर्लजपणाच आहे!” असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे,

भारतीय जनता पक्ष हा नक्की किती तोंडी नाग आहे? त्यावर नव्याने संशोधन करायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमान प्रश्नी भाजप नेमके हेच करीत आहे. छत्रपतींचा अपमान महाराष्ट्राच्या राज्यपालांनी करूनही त्यांच्या धमन्या थंडच आहेत व ज्यांनी उसळून तलवार काढली आहे त्यांच्यावर हल्ले सुरू केले. महसूलमंत्री विखे पाटील यांनी राज्यपालांचा बचाव केला. कोश्यारींविरोधात लोकभावना भडकविण्याचा विरोधकांचा डाव असल्याचे विखे पाटलांनी सांगितले. विखेंनी असे बोलणे हा महाराष्ट्राच्या लोकभावनेचाही अपमान आहे.

सातारचे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खवळून सांगितले, ‘छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे सत्तेवर राहतात हा निर्लज्जपणा आहे.’ यावर विखे पाटील वगैरे लोकांचे काय म्हणणे आहे? राज्यपालांविरुद्ध लोकभावना भडकलेल्याच आहेत. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नाही, पण दुःख हे की, महाराष्ट्राचे वरिष्ठ मंत्री अपमानाचे समर्थन करीत आहेत.

Team Global News Marathi: