शिवसेनेचे दोन माजी मंत्री, एक विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात?

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून सत्तधारी आणि विरोधकामधे शाब्दिक युद्ध पेटलेले दिसून आले होते अशातच सरकारच्या पडण्याच्या रोज वेगवेगळ्या तारखा विरोधकांकडून जाहीर करण्यात येत होत्या अशातच आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका २०२४ साठी भाजपने आता तयारी सुरु केली आहे.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात थेट शिवसेनेला आव्हान देण्याची भाजपने रणनिती आखली आहे. त्यासाठी त्यांनी आता शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी आणि नाराजीचा फायदा घेण्याची तयारी भाजपने केली आहे. याचाच एक भाग म्हणून शिवसेनेतील दोन नाराज मंत्री आणि एक विद्यमान आमदाराची भाजपसोबत चर्चेच्या दोन फेरी झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. शिवसेना पक्षावर नाराज असलेल्यांना गळाला लावत थेट शिवसेनेला आव्हान देण्याची भाजपने तयारी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर याबाबतच्या घडामोडी या वेगाने घडणार आहेत. कोकणातील संपूर्ण परिस्थिती आणि शिवसेनेचा पारंपरिक मतदार असलेल्या कोकणात भाजप जोरदार तयारी करत आहे. सध्या निरीक्षक म्हणून मूळ कोकणातील आणि आक्रमक, अभ्यासू नेता असलेल्या आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच प्रसाद लाड देखील मागील काही दिवसांपासून कोकणात दौरे करत आहेत. तर माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेळावे, विविध कार्यक्रम, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे भाजपने लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकांची तयारी केल्याची चर्चा कोकणातील राजकीय वर्तुळात जोरदार सुरु आहे.

 

Team Global News Marathi: