“शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत, सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे? सरकारचे की,

 

मुंबई |  राज्यात महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झालेली असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच संमना अग्रलेखातून विरोधकांना टोला हाणणाऱ्या खासदार संजय राऊत यांचा आता भाजपा महिला नेत्या चित्रा वाघ यांनी समाचार घेतला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिवसेनेचे सर्वज्ञानी खासदार संजय राऊत सांगा आता थोबाड कोणाचे फोडायचे सरकारचे की, विरोधकांचे, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला असून, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत, अशी टीका केली. वाघ यांनी पोलीस ठाण्याला भेट देत घटनेची माहिती घेतली.

डोंबिवलीच्या भोपर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलीवर ३३ जणांनी अत्याचार केला. त्या मुलीच्या अत्याचाराची व्हिडिओ क्लिप बनवून तिला ब्लॅकमेल केले. हे कायद्याचे राज्य आहे का, असा सवाल त्यांनी केला. या प्रकरणात तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न वाढले असून, राजकारण बाजूला ठेवून चर्चा करण्यास विशेष अधिवेशन बोलवण्याचे आदेश राज्यपालांनी दिले. त्याचे समर्थन देण्याऐवजी सरकारमधले जबाबदार नेते विरोधी पक्षावर टिपणी करून वेळ मारून नेत आहेत.

राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढलेले असताना आणखी किती मुलींचे, महिलांचे लचके तोडले जाणार आहेत, डोंबिवलीच्या घटनेत ३० जणांनी अल्पवयीन मुलीचे लचके तोडले, या सरकारच्या काळात महिला सुरक्षित का नाहीत, असा सवाल त्यांनी केला.

Team Global News Marathi: