हाथसार प्रकरणी शिवसेनेचं चर्चगेट रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन
हाथसार येथे एका दलित अल्पवयीन मुलीवर तेथिल स्थानिक सवर्ण समाजाच्या इसमांनी बलात्कार करून तिच्यावर अमानवीय कृत्य केले होते. या प्रकारामुळे संपूर्ण देशभरात संतापाचे वातावरण पसरले होते. त्यातच सदर मुलीचा मृतदेह संशयास्पद तिच्या राहत्या गावात आणून तिच्यावर कुटुंबीयाचा विरोध डावलून अंत्यसंस्कार करण्यात आले होते. याविरोधात शिवसेना पक्षाने काल चर्चगेट स्थानकावर उत्तरप्रदेश सरकार विरोधात आंदोलन केले.
शिवसेनेच्या आंदोलनात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांचाही सहभाग होता. हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला. तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर उपरादरम्यान या मुलीचा दिल्लीतल्या रुग्णालयात मृत्यू झाला. या सगळ्या घटनेचे पडसाद बुधवार, गुरुवार असे दोन दिवस देशभरातल्या विविध ठिकाणी उमटले.
भाजपचे लोक रस्त्यावर का उतरत नाही ! त्यांच्या घरी मुली, आई, बहिणी नाहीत का? – खासदार इम्तियाज जलील
यावर भाष्य करताना शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले की, घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. जसे विकास दुबेला मारलं, की कोणत्याही परिस्थितीत सत्य बाहेर येऊ नये त्याच परिस्थितीत काळ्या अंधारात पीडितेच्या मृतदेहावर अंतसंस्कार करण्यात आले. पुढे बोलताना खासदार सावंत म्हणाले की, हीच लोक जेव्हा आमच्या पालघरला जेव्हा साधूंच प्रकरण झालं तेव्हा लगेच राष्ट्रपती राजवटीची मागणी करत होते. कुठे गेले त्या टिनपाट साऱ्या नट्या, Y+ सुरक्षा घेणारे कुठे आहेत, कोण देणार गरिबांना सुरक्षा असे म्हणत कंगना रानौत आणि तिच्या समर्थांत उतरलेल्या भाजपा नेत्यांना सावंत यांनी टोला लगावला होता.
दरम्यान, जाळून मुलगी दिला संदेश बदनाम झालं उत्तरप्रदेश, दलित बेटी की जान गयी, सीएम, मोदीका ध्यान नहीं अशा घोषणाही यावेळी शिवसेनेने दिल्या आहेत. युपीमें दुःख मस्तीमें, पुलिस दरिंदे मस्तीमें अशाही घोषणाही दिल्या गेल्या. उत्तर प्रदेशातून कमाई करण्यासाठी अनेक लोक मुंबईत येतात. मुंबई त्यांना सामावूनही घेते मात्र मुंबईला कुणी काही बोललं तर हे लोक आवाज उठवत नाहीत. आता उत्तर प्रदेशात एवढी अमानुष घटना घडली आहे तर उत्तर प्रदेशातले लोक गप्प का असाही प्रश्न काही आंदोलकांनी विचारला.