“शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त.”- रावसाहेब दानवे यांचा टोला

 

गोवा आणि उत्तर प्रदेशातील मतमोजणीतून हे स्पष्ट होत आहे कि जनतेची पुन्हा भारतीय जनता पक्षाला प्रथम पसंती दिली आहे. यूपी आणि गोव्यात शिवसेना सपशेल फेल झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला नाटो पेक्षाही कमी मते मिळाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

याच संदर्भात भाजपचे मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते, तसेच शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही असा खोचक टोला दानवेंनी शिवसेनेला लगावला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर उत्तर प्रदेश आणि गोव्यातही पक्ष विस्ताराचे धोरण ठेवत शिवसेना या निवडणुकीच्या रिंगणात उतरली. याआधीही शिवसेनेने असे प्रयोग केले आहेत. मात्र तेव्हाही फारसे यश मिळालेले नाही. गोवा आणि उत्तर प्रदेशात शिवसेनेला हार पत्करावी लागणार, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे शिवसेना जिथे गेली तिथे डिपॉझिट जप्त होते, अशी टीका रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

Team Global News Marathi: