शिवसेनेने नारायण राणेंना पुन्हा डिवचले, सामानाच्या अग्रलेखाचा लगावला पोस्टर !

 

नाशिक | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोक्षात कोकणात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या टिपण्णीचे केंद्र मुंबई असले तरी याचे पडसाद नाशिक जिल्ह्यात दिसून आले होते. अद्यापही नाशिकमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष सुरूच असून आज शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखाचे पोस्टर शहरभर झळकावत पुन्हा  भाजपाला आणि राणेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

नारायण राणेंच्या वक्तव्याचे मंगळवारी तीव्र पडसाद नाशिकमध्ये उमटले होते. शिवसेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी राणेंविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिस आयुक्तांनी थेट राणेंच्या अटकेचे आदेश काढले आहे. नाशिकमध्येच नारायण राणेंविरोधात तीन गुन्हे दाखल झाले होते. नारायण राणे व भाजप विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले होते. प्रथम युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून भाजप कार्यालयाच्या काचा फोडल्या. आज बुधवारीही हा तणाव कायम आहे. शिवसैनिकांना नाशिकमध्ये भाजपविरोधात पोस्टरबाजी केली आहे.

शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद नाशकात अजून सुरूच असून काल गुन्हा दाखल केल्यानंतर आज नाशिक महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सामनातील अग्रलेखाचे पोस्टर्स लावून पुन्हा राणे आणि भाजपला पुन्हा डिवचले आहे. ‘भोक पडलेला फुगा ,नारायण नारायण …’ या सामनातील अग्रलेखाचे पोस्टर्स शहरात लावल्याने दोन्ही पक्षातील संघर्ष अधिकच चिघळला आहे. बोरस्ते यांनी पोस्टर्स लावल्यानंतर पोस्टर्स काढण्यासाठी त्यांच्यावर पोलिसांनी दबाव टाकला आहे. परंतु शिवसेनेने परवानगी घेऊन पोस्टर्स लावल्याने पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. सध्या अजूनही हे पोस्टर नाशिकमध्ये झळकताना दिसून येत आहे,

Team Global News Marathi: