आता तुम्ही चौकशांना घाबरायला पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा आमची सत्ता आहे, हे लक्षात असू द्या,.

‘आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, पत्ते तुम्ही पिसताय, उद्या डाव आम्ही उलटवू’

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाहीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आक्रमक होऊन भाजपवर जोरदार हल्ला चढविला आहे. आज पुन्हा एकदा प्रसार माध्यमांशी बोलताना भाजपवर हल्ला चढवला आहे.

ईडी उत्खनन करत मोहेंजोदारो आणि हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे मला, उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा महाविकास आघाडीतील आणखी प्रमुख नेत्यांना ईडीची नोटीस आली तरीही आघाडी सरकाराला धक्का बसणार नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं.

ईडीच्या कारवाईबाबत स्वतः प्रताप सरनाईक स्पष्टीकरण दिले आहे. ज्या प्रकरणाचा तपास ईडी करत आहे, त्याच्याशी सरनाईक कुटुंबाचा कुठलाही संबंध नाही. मराठी माणसाने महाराष्ट्रात व्यापार उद्योग करणं, हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून त्यांना संपवण्याचं धोरण कोणी राबवत असेल, तर हा मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय देऊन उभा राहील, असा कडक इशारा संजय राऊत यांनी दिला.

असल्या चौकशीला कोणीही घाबरत नाही, घाबरण्याचं कारणच नाही. आता तुम्ही चौकशांना घाबरायला पाहिजे. महाराष्ट्रातसुद्धा आमची सत्ता आहे, हे लक्षात असू द्या,. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, हे विसरु नका. मला अनेकांनी विचारलं की तुम्हाला ईडीची नोटीस आली का? सध्या आली नाही, पण आली तरी मला आश्चर्य वाटणार नाही.

मला, अजित पवारांना किंवा अन्य कोणालाही येऊ शकते. शरद पवारांना तर येऊनही गेली. मला असं कळलं की जुनी थडगी उकरण्याचा प्रयत्न, वीस-वीस वर्षांपूर्वीचं उत्खनन सध्या सुरु आहे. ईडीवाले मोहेंजोदारो हडप्पापर्यंत पोहोचले आहेत. काढू द्या, आम्हीही तयार आहोत” असं संजय राऊत म्हणाले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: