शिवसेना खासदार भावना गवळी सध्या ईडीच्या रडारवर

 

राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर किडीच्या तपस आयंत्रणेने कारवाई केली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या कार्यालयावर आणि संस्थांवर ईडने कारवाई केली होती. त्यातच पुन्हा एकदा भावना गवळी यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहिती नुसार २० ऑक्टोबर रोजी केंद्रीय एजन्सीसमोर हजर राहण्यास ईडीने कळवले आहे. तत्पूर्वी, २८ ऑक्टोबर रोजी ईडीने एक मोठी कारवाई करत शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांच्या कंपनीचे संचालक आणि त्यांचे निकटवर्तीय सईद खान यांना अटक केली. मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांना १ ऑक्टोबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत पाठवले होते.

भावना गवळी या यवतमाळच्या शिवसेनेच्या खासदार आहेत. गेल्या सलग पाच लोकसभा निवडणुकांपासून त्या निवडणुका जिंकत आहेत. १९९९ साली भावना गवळी पहिल्यांदा लोकसभेच्या खासदार झाल्या. त्यानंतर २००४, २००९, २०१४ आणि २०१९ मध्येही त्या खासदार झाल्या.

Team Global News Marathi: