शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढणार! कंपनी व्यवहार मंत्रालयाक पोलिसांना पत्र

 

मुंबई | शिवसेना नेते आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने मुंबई पोलिसांनी पत्र लिहून यशवंत जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार दिली आहे. कॉर्पोरेट कंपनी काईयक मंत्रालयाच्या (एमसीए) अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना लिहिलेल्या पत्रानुसार, प्रधान डिलर्ससह 6 कंपन्यांविरुद्ध भारतीय दंड विधान (भादंवि) कलम 420, 120 ब अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची तक्रार केली आहे.

या तक्रारीमध्ये यशवंत जाधव यांच नाव नाही. मात्र, या सगळ्या कंपन्या यशवंत जाधव यांच्याशी संबंधित असल्याचे MCAने म्हटले आहे. यशवंत जाधव यांच्याविरुद्ध सुरु असलेल्या तपासामध्ये या कंपनीने केलेले गैरव्यवहार समोर आले आहेत. आगामी काळात यशवंत जाधव यांच्याविरुद्धदेखील कारवाई केली जाऊ शकते.

MCA ने कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि अनियमिततेशी संबंधित मुद्द्यांवर प्रधान डिलर्स प्रायव्हेट लिमिटेडची तपासणी केली. तपासात असे आढळून आले की या कंपनीचे शेअरहोल्डिंग असलेल्या दोन संस्था या कोलकातामधील आहेत. स्कायलिंक कमर्शियल लिमिटेड आणि सुपरसॉफ्ट सप्लायर्स लि. या शेल कंपन्या कोलकाता येथील एंट्री ऑपरेटर्सनी तयार केल्या आहेत.

यशवंत जाधव यांच्या कुटुंबीयांना 15 कोटी रुपयांचे असुरक्षित कर्ज या कंपन्या मार्फत दिले गेले. जाधव यांच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या रोख रकमेच्या बदल्यात या कंपनीकडून असुरक्षित कर्जे दिली गेली. बहुस्तरीय व्यवहारांद्वारे लाँडरिंग केले गेल्याचे आरोप आहेत.

Team Global News Marathi: