शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर ठोकली मानहानीची केस

मुंबई : माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई पाटकर परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्यावर जमीन गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला होता.

आता सोमय्या यांच्या या टीकेला शिवसेना नेते रवींद्र वायकर यांनी मानहानीची नोटीस पाठवुन उत्तर दिले आहे, कोलाई व महाकाली येथील जागेच्या प्रकरणी खोटे आरोप करुन जनमानसात आपली, कुटुंबांची व पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचा आरोप वायकरांनी सोमय्यांवर केला आहे.

या संदर्भात वायकर यांनी सोमय्या यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. रवीद्र वायकर यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनुसार सोमय्या यांनी वरील दोन्ही प्रकरणी जाहीर माफी न मागितल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याचा रवींद्र इशारा वायकर यांनी दिला आहे.

काही महिन्यांपुर्वीच किरीट सोमय्या यांनी मनिषा रविंद्र वायकर तसेच रश्मी उद्धव ठाकरे यांनी अलिबाग कोर्लाई येथे खरेदी केलेल्या संयुक्त जमिनीवर १९ बंगले असल्याचा तसेच वरील माहिती निवडणुक आयोगाकडे लपविल्याचा दावा केला होता. मात्र लावलेले आरोप चुकीचे असून प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरो रवींद्र वायकर यांनी केला आहे.

Team Global News Marathi: