शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. संजय राऊत यांच्यावर मागच्यावर्षी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर तब्बल एक वर्षाने पुन्हा त्रास होऊ लागल्यामुळे आज पुन्हा लीलावती रुग्णलयात दाखल होणार असून त्यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


लीलावती रुग्णालयातील डॉ. मॅथ्यू आणि डॉ. मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली संजय राऊत यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहे. आज संध्याकाळी संजय राऊत रुग्णालयात दाखल होणार असून गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळले होते त्यामुळं शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

त्यात पुन्हा एप्रिल २०२०मध्ये आणखी एक शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळं ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. तीच शस्त्रक्रिया गुरुवारी (दिनांक ३ डिसेंबर ) करण्यात येणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: