शिवसेना युपीएचा सदस्य नाही संजय राऊत यांना बोलणायचा अधिकार नाही – नाना पटोले

मुंबई :युपीए अध्यक्षपदावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचे नाव सुचविले होते. भाजपाला टक्कर देण्यासाठी युपीएच नेतृत्व खंबीर हातात दिले पाहिजे असे विधान त्यांनी केले होते. यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी राऊतांना चांगलेच खडेबोल सुनावले होते. आता पुन्हा यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य करत संजय राऊतांना टोला लगावला आहे.

खासदार संजय राऊत हे आता शरद पवारांचे प्रवक्ते झाले आहेत. शिवसेना किंवा संजय राऊत यांना ह्या प्रकारचे वक्तव्य करण्याचा अधिकार नाही कारण शिवसेना ही युपीए’चा घटक पक्ष नाही असे पटोले यांनी मुंबई पत्रकार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हंटले आहे.

तसेच ज्यावेळी शिवसेना युपीएमध्ये प्रवेश करेल तेव्हा त्यांना यावर भाष्य करण्याचा अधिकार राहील. मात्र संजय राऊत या विषयी सतत भाष्य करत राहतात. याविषयी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी भेट झाल्यानंतर सदर प्रकरण त्यांच्या कानावर घालणार आहे असे पटोले यांनी बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: