‘शिवसेना-भाजप युती व्हायला ती काही ‘इन्स्टंट कॉफी’ नाही’

 

मुंबई | प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांनी शिवसेनेवर केलेल्या युतीच्या भाष्यानंतर भविष्यात शिवसेना-भाजपा युती होणार अशी सहायता वर्तवली जात असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागपुरात सेना-भाजपा युतीवर सूचक भाष्य करत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात काल भेट झाली. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये केवळ राजकीय वितुष्ट आहेत अशी विधानं दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून केली जात असताना याबाबत सुप्रिया सुळेंना विचारणा करण्यात आली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी या भेटीवर भारतीय जनता पक्षाला मिश्किल टोला लगावला.

“शिवसेना-भाजपचे नेते भेटतात, त्यात काही चुकीचं नाही. राजकारणापलीकडे वैयक्तिक संबंध जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत. शिवसेना-भाजपचे नेते भेटले की लगेच युती व्हायला ती काही इन्स्टंट कॉफी नाही आणि अशा घटनांवर तातडीनं प्रतिक्रिया द्यायला माझं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Team Global News Marathi: