शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ

 

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात भाजपचे आमदार नितेश राणे अडचणीत सापडले आहेत. आज कणकवली पोलिसांनी नितेश राणे यांची चौकशी केली आहे.नितेश राणे हे आपल्या वकिलांसोबत कणकवली पोलिस ठाण्यात हजर झाले होते. आज झालेली चौकशी सुमारे एक तास चालली असल्याचे कळते आहे.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी नितेश राणे अडचणीत सापडले आहे. या प्रकरणी नितेश यांच्या वकिलांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

त्यानंतर आमदार राणेंच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथेही त्यांना अटकपूर्व जामीन काही मिळाला नाही. मात्र अटकेपासून काही दिवस संरक्षण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.आज कणकवली पोलिसांनी नितेश राणेंची सुमारे तासभर चौकशी केली. यावेळी नितेश राणे यांच्या सोबत त्यांचे वकील संग्राम देसाई देखील उपस्थित होते.

Team Global News Marathi: