शिंदे सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहुर्त मिळाला? वाचा कोणाला मिळणार संधी

 

राज्यात सत्तेवर असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप पूर्ण झालेला नाही. जून महिन्याच्या अखेरीस शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीच दीड महिना कारभार चालवला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात या सरकारचा पहिला विस्तार झाला होता.

मात्र काही दिवसांनी त्यामध्ये मोजक्याच आमदारांना स्थान देण्यात आले होते. त्यामुळे शिंदे सरकारचा दुसरा विस्तार कधी होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करण्यासाठी मुहुर्त मिळाला असून, दसऱ्याच्या मुहुर्तावर सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दसऱ्याच्या मुहुर्तावर शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी माहिती माहिती दिली आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे संकेत सरकारकडून मिळत आहेत. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात अनेक दिग्गज नेत्यांना संधी मिळालेली नाहीत. त्यामुळे आता या मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Team Global News Marathi: