शिंदे गटात सामील झालेले खासदार सदाशिव लोखंडे यांच्या तोंडाला फासले काळे

 

नगर | शिवसैनिकांनी बंडखोर खासदार सदाशिव लोखंडे यांच्या पोस्टरला काळे फासले. शहरातील शिवसेनेच्या कार्यालयावरील बॅनरवर बंडखोर खासदार लोखंडे यांचा फोटो होता. त्यावर शहरातील शिवसैनिकांनी काळे फासत निष्क्रीय खासदार दुसऱ्या गटात गेल्याने पेढे भरून, ढोल वाजविला. संगमनेरात लोखंडे आले तर त्यांना फटकविल्याशिवाय राहणार नाही, अशा कठोर शब्दांत शहर प्रमुख अमर कतारी यांनी निषेध केला.

एकीकडे शिवसेना गटातुन बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. यात प्रामुख्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट यांच्यात काही दिवसांपासून रणकंदन माजले आहे. अशातच राज्यातील अनेक आमदारांनी शिवसेनेला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला.

राज्यातील खासदारांसह शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केल्याने संगमनेर शहरातील शिवसैनिक आक्रमक होऊन शिवसेना शहर कार्यालयाच्या बॅनरवर असलेला लोखंडे यांच्या फोटोला काळे फसले. निष्क्रीय खासदार शिवसेनेतून शिंदे गटात गेल्याने पेढे भरवून आनंद ही साजरा करण्यात आला. शिर्डी लोकसंख्या मतदार संघात खासदार लोखंडे यांना आम्ही दोन वेळा निवडून दिले. परंतु त्यांनी कधीही काम तर केले नाही. तसेच कुठेही फिरले सुद्धा नाही. त्यामुळे असे निष्क्रीय खासदार आम्हाला नकोच होते असे सुद्धा शिवसैनिकांनी बोलून दाखविले होते.

३० जणांचा शुक्रवारी शपथविधी?; पहिल्या यादीत भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना स्थान

“.डर के माध्यम से शोषण किया जाता है”, संजय राऊतांचे सूचक ट्वीट

Team Global News Marathi: