“शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार”; देवेंद्र फडणवीस

 

एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेऊनमहिना उलट;या तर अद्याप शपथ विधाचा पत्ता नाहीये. यावरून विरोधक शिंदे-भाजप सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. तर दुसरीकडे टीकेची पर्वा न करता भाजप आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी लागली असून, केंद्रीय मंत्र्यांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा शब्द दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मंत्रिमंडळाचा विस्तार करु नका, असे कुठेही म्हटलेले नाही. न्यायालयातील सुनावणीचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणाताही संबध नाही, याचा पुनरुच्चार देवेंद्र फडणवीस यांनी केला. शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी चर्चा अनेकजण करत आहेत. यासंबंधी फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर, कोण काय म्हणते याला काही महत्त्व नाही. त्यावर उत्तरे द्यायला मी काही रिकामटेकडा नाही. परिस्थिती काय आहे याला राजकारणात महत्त्व असते, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिंदे गटाचे खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत, केवळ भावनिक भाषण देऊन जनता सोबत येत नसते असा नाव न घेता टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. भाजपने गेल्या सहा महिन्यापासून लोकसभेच्या १६ मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

या मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ देखील आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये बारामती मतदारसंघात आम्हाला चांगली मते मिळाली आहेत. बारामती मतदारसंघाची जबाबदारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना दिली आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीत येणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Team Global News Marathi: