शिंदे गटाच्या पदाधिकार्‍याचा विवाहितेवर बलात्कार, खाजगी फोटो वायरल करण्याची धमकी देत उकळले पैसे

 

शिंदे गटाच्या पदाधिकार्‍याने एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले व नंतर तिचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून कोट्यवधी रुपये लुटले.सिडको एन-2 परिसरात ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर शिंदे गटाचा नराधम पदाधिकारी ज्योतिराम पाटील फरार असून पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथके तैनात केली आहेत.

सिडको एन-2, ठाकरेनगरातील महिलेचे 2016 मध्ये एका शासकीय कर्मचार्‍यासोबत लग्न झाले होते. गारखेडा, मातोश्रीनगरातील ज्योतिराम पाटील ऊर्फ ज्योतिराम विठ्ठलराव धोंगडे (28) हा मनपाच्या पाण्याचा टँकरने पाणीपुरवठा करत असताना त्याचे महिलेसोबत सूत जुळले. ज्योतिराम पाटील हा शिंदे गटाचा पदाधिकारीदेखील आहे. महिलेचे तिच्या पतीसोबत पटत नसल्याचा फायदा घेत ज्योतिरामने तिला लग्नाचे आमिष दाखवत तीन वर्षांपूर्वी दौलताबाद येथील रिसॉर्टवर नेले. एका खोलीत त्याने महिलेवर बलात्कार करत तिचे व्हिडिओ आणि फोटोशूट केले. शूट केलेले व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वेळोवेळी शहरातील हॉटेलसह मुंबई आणि पुण्यात नेऊन देखील बलात्कार केला

महिलेने लग्नाचा तगादा लावला असता ज्योतिरामने लग्नास नकार देत बंदुकीचा धाक दाखवत मुलीला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी महिलेच्या तक्रारीवरून शिंदे सेनेगटाचा पदाधिकारी ज्योतिराम पाटील ऊर्फ ज्योतिराम विठ्ठलराम धोंडगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. ज्योतिराम पाटील हा एकनाथ शिंदे यांनी नेमलेल्या राजेंद्र जंजाळ यांचा निकटवर्तीय आहे.

Team Global News Marathi: