खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारणाचे सूचक वक्तव्य

खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शरद पवारणाचे सूचक वक्तव्य

भाजपचे जेष्ठ नेते, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादी पक्षात प्रवेश संभाव्य प्रवेशाबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ‘खडसेंचं कर्तृत्व, काम आणि खानदेशातील त्यांच्या स्थानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही,’ असे पवार यांनी म्हटल आहे. पवारांच्या या वक्त्यव्याचा राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ लावले जात आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी शरद पवार दोन दिवसाईया उस्मानाबाद जिल्हयाच्या दौऱ्यावर आले होते. रविवारी त्यांनी तुळजापूर येथे शेतकऱ्याशी संवाद साधला होता. त्यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकार माध्यमाशी संवाद साधला होता. यावेळी पत्रकारांनी शेत विषयी प्रश्नांसोबत त्यांना राजकीय प्रश सुद्धा विचारण्यात आले होते. यावेळी त्यांना खडसे बाबत विचारण्यात आले असता यावर पवार काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र यावेळी पवारांनी खडसे संदर्भात थेट बोलणे टाळले होते.

यावेळी खडसे यांच्याबद्दल बोलताना पवार म्हणाले की, ‘एकनाथ खडसे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. एकनाथ खडसे हे विरोधी पक्षनेते होते. अर्थमंत्री होते. आम्हाला शिव्या घालत होते. पण विरोधकांच्या बाजूने ते प्रखरतेने दिसत होते.

मात्र भाजपने दुर्दैवानं त्यांची नोंद घेतली गेली नाही असे त्यांना वाटते. त्यामुळं जिथे नोंद घेतली जाईल, तिथे जाण्याचा त्यांचा विचार असल्याचे समजतं आहे. एखाद्या पक्षाबद्दल त्यांना विश्वास वाटत असेल तर आम्ही काय करू शकतो,’ असा प्रतिप्रश्नही पवारांनी केला

ग्लोबल न्युज नेटवर्क: