शरद पवारांच्या त्या ट्विटवरून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद, तर अजित पवार म्हणतायत

 

गौतम अदानी प्रकरणात जेपीसी नियुक्त करण्याची आवश्यकता नसल्याचं विधान करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. या विधानावरून शरद पवारांनी थेट काँग्रेस पक्षाला डिवचण्याचा काम केले होते तर दुसरीकडे या विधानावरून काँग्रेसने थेट शरद पवारांना लक्ष केलं होत त्यामुळे राज्यात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये दोन प्रवाह निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले होते.

तर दुसरीकडे शरद पवारांच्या या विधानानंतर काँग्रेस वरिष्ठ नेत्या अलका लांबा यांनी थेट नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला होता. या संदर्भात अलका लांबा यांनी ट्विट करून शरद पवारांना टोला लगावला होता. मात्र दुसरीकडे अलका लांबा यांच्या या ट्विटवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच संतापले आहेत. अजित पवारांची प्रतिक्रिया अलका लांबा यांनी केलेल्या ट्विटबाबत विचारले असता अजित पवार चांगलेच संतापले.

अजित पवार म्हणाले की, कोणी आम्हाला काही म्हटलं तरी आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत, आम्ही कोणच्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधिल नाहीत. जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं आमचं काम आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. आता अजित पवारांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा वाद होण्याचे चिन्ह दिसून येत आहे.

Team Global News Marathi: