शरद पवारांच्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांचे नाव न घेता लगावला टोला

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडीओ काॅन्फरन्समध्ये उपस्थितांना विरोध पक्षातील एका नेत्यासंबंधी किस्सा सांगितला. मोदी म्हणाले की, “एक दिवस मला एक वरिष्ठ नेते मला भेटले. ते मला कायमच राजकीय विरोधात असतात. पण, मी त्यांचा सन्मान करतो. ते काही मुद्द्यांवर खूश नव्हते. त्यामुळे ते मला भेटायला आले होते.

पुढे बोलताना मोदी म्हणतायत की, ते म्हणाले की, देशाने तुम्हाला दोन वेळा पंतप्रधान बनविले. पुढे काय करणार आहात? त्यांना असं वाटतं की, दोन वेळा पंतप्रधान झाले, तर सर्व काही प्राप्त झाले. पण, त्यांना माहिती नाही की, मोदी एक वेगळ्याच मातीपासून तयार झाला आहे. त्याला गुजरातच्या मातीने तयार केलेले आहे.”

मोदींना हा किस्सा सांगताना कोणत्या नेत्याच्या नावाचा उल्लेख केला नाही. मात्र, त्यांनी हे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या भेटीनंतर केलेलं आहे. शिवसेना नेता संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांवर ईडीची कारवाई संदर्भात शरद पवार यांची भेट झालेली होती.

मोदी पुढे म्हणाले की, “मी पंतप्रधान झाल्यानंतर माझं सरकार हे कल्याणकारी योजनांच्या लाभ समाजातील शेवटच्या माणसांना कसा घेता येईल, यासाठी प्रयत्न करत आहे. १०० टक्के हा फक्त आकडा नाही की, तर हे सरकार किती संवेदनशील आणि जनतेची काळजी करणार आहे, हे सिद्ध करते. माझं सरकार ८ वर्षांत देशातील १०० टक्के लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण केल्याशिवाय मी थांबणार नाही.

Team Global News Marathi: