शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा |

नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली आहे. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयात या दोन नेत्यांची भेट झाली. जवळपास १ तासांहून अधिक वेळ त्यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांनी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे.

आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर मोदी आणि शरद पवार यांच्या बैठका कमी झाल्या होत्या. शरद पवार यांच्या शस्त्रक्रियानंतर या दोन नेत्यांची पहिलीच भेट आहे. त्यानंतर आता शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली.

संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे आगामी लोकसभेच्या अधिवेशनात कृषी कायद्यासंबंधी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

Team Global News Marathi: