शरद पवार मविआच्या सभेला संबोधित करणार, मोर्चामध्ये होणार सामील

 

काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू असून याच पार्श्वभूमीवर एकीकडे राज्यपाल आणि भाजप नेत्यांच्या विरोधात महाविकासआघाडीने शनिवारी 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चाचे आयोजन केलं आहे. या मोर्चाला तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित राहणार असल्यासाचे बोलले जात आहे. मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

या मोर्चात तिन्ही पक्षांचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहून संबोधित करणार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत. तब्बेतीच्या कारणामुळं शरद पवार मविआच्या सभेस्थळी उपस्थित राहणार की नाही? अशी चर्चा सुरु होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार हे साडेबारा वाजता सभेस्थळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते सभेला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कोणतीही भूमिका न घेतल्यानं शरद पवारांनी खंत व्यक्त केली. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं याबाबत जी काळजी घ्यायला हवी होती ती काळजी घेतली नाही. त्यांची केवळ बघ्याची भूमिका आहे. त्यामुळं लोकांमध्ये संताप असल्याचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.

Team Global News Marathi: