शरद पवार हेच उद्धव ठाकरे यांचे विठ्ठल आणि सिल्वर ओक हीच पांढरी – आचार्य तुषार भोसले
सध्या कोरोनाच्या वाढत्या पाश्वभूमीवर राज्यातील सर्व देवस्थाने आणि मंदिरे उघडण्याची आघाडी सरकारने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे साधू, महंतांनी येत्या २९ ऑगस्ट पर्यंत मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे जर मागणी मान्य न केल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा साधू, महंतांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.
यावेळी आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सुद्धा टीका केली होती. ‘दार उघड, उद्धवा दार उघड’ अशी हाकही आचार्य भोसले यांनी यावेळी दिली. “शरद पवार हेच उद्धव ठाकरे यांचे विठ्ठल आहेत आणि सिल्व्हर ओक हीच त्यांची पंढरी आहे, असे म्हणत अध्यात्मिक समन्वय आघाडीने मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली.
या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा देत भाजपाच्या कार्यकर्ते,पदाधिकारी, लोकप्रतिनिधींना सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. तसेच विश्व हिंदु परिषदेने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच अ.भा.संत समिती, अ.भा.वारकरी मंडळ,वारकरी महामंडळ, अ.भा.पुरोहित संघ,जय बाबाजी भक्त परिवार यांच्यासह वारकरी,महानुभाव,लिंगायत,जैन,शीख संप्रदायांच्या अनेक आणि महाराष्ट्रातील अन्य प्रमुख धार्मिक संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत.