शरद पवार आता फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत विराजमान, जयंत पाटलांचे विधान

  • शरद पवार आता फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत विराजमान, जयंत पाटलांचे विधान

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस, शरद पवारांनी मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री, राज्यसभा खासदार असे विविध पदे भूषविली आहेत. सध्या ते राज्यसभा खासदार आहे. तसेच आघाडी सरकारचे मार्गदर्शक आहे.

महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणूकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगामध्ये त्यांनी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार म्हणजेच शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी यांची मूठ बांधण्यात आली. ८० व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

शरद पवार हे महाराष्ट्र घडवणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले आहे. शरद पवार यांनी शनिवारी वयाच्या 80 व्या वर्षात पदार्पण केले. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी ट्विट करुन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम-सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे. आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा आहेत. असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: