शरद पवार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत म्हणाले की,
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सकाळीच चैत्यभूमी येथे दाखल झाले होते. तसेच राज्यातील सत्ताधारी पक्षातील अनेक मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे भेट दिली होती.
दरवर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दादर येथील चैत्यभूमीवर हजारो आंबेडकर अनुयायी हजेरी लावतात. मात्र यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर घरातूनच आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलं.
यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी डॉ. आंबडेकर यांना अभिवादन करत एक ट्विट केले. ‘सांविधानिक मूल्ये व आत्मभान देणारे प्रज्ञासूर्य महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी, दादर येथे जाऊन आज महापरिनिर्वाण दिनी विनम्रपणे अभिवादन केले! असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
सांविधानिक मूल्ये व आत्मभान देणारे प्रज्ञासूर्य महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी, दादर येथे जाऊन आज महापरिनिर्वाण दिनी विनम्रपणे अभिवादन केले!#BhimraoAmbedkar#Ambedkar #बाबासाहेब_अमर_रहे pic.twitter.com/ojyLhgjp8U
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 6, 2020
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार हे सकाळी आठ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर दाखल झाले. यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते. बाबासाहेबांना पुष्प अर्पण करून मान्यवरांनी आदरांजली वाहिली.