शेअर बाजारात सेन्सेक्सने ओलांडला ६१ हजार अंकांचा टप्पा

 

शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर काही वेळेतच सेन्सेक्सने 61 हजार अंकांचा टप्पा ओलांडला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 67.99 अंकांच्या तेजीसह 61,405.80 अंकांवर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 19.10 अंकांच्या तेजीसह 18,288.10 अंकांवर खुला झाला.

शेअर बाजारात आज तेजीचे संकेत दिसत आहेत. शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात झाल्यानंतर नफावसुलीने काही प्रमाणात निर्देशांकात घसरण दिसली. मात्र, त्यानंतर बाजार सावरला. सकाळी 9.50 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 93 अंकांच्या तेजीसह 61,431.69 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 23.35 अंकांच्या तेजीसह 18,292.35 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टी 50 मधील 35 कंपन्यांचे शेअर तेजीत दिसून आले. तर, 15 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.

सेन्सेक्स निर्देशांकात समावेश असणाऱ्या 30 पैकी 21 कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे. यामध्ये भारती एअरटेल, पॉवरग्रीड, आयटीसी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, एचडीएफसी, अल्ट्राटेक, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, टेक महिंद्रा या कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून येत आहे.

तर, निफ्टी निर्देशांकातील पॉवरग्रीडच्या शेअर दरात 2.16 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. तर, आयटीसीच्या शेअर दरात 1.87 टक्के, नेस्लेच्या शेअर दरात 1.58 टक्क्यांची तेजी दिसून येत आहे. बजाज ऑटोच्या शेअर दरात 1.14 टक्क्यांची दिसत आहेत. तर, इन्फोसिसच्या शेअर दरात 1.16 टक्क्यांची घसरण दिसत आहे. सनफार्मामध्ये 1.01 टक्के, ओएनजीसीच्या शेअर दरात 0.99 टक्के, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 0.85 टक्के, बीपीसीएलच्या शेअर दरात 0.85 टक्क्यांची घसरण दिसत आहे.

Team Global News Marathi: