केंद्र सरकारची कॉमन यूएसबी टाइप सी चार्जर आणण्यास मंजुरी

 

मुंबई | केंद्र सरकार लवकरच मोबाइल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी कॉमन चार्जरला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या वतीने ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डने मार्च २०२५ पर्यंत सगळ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी कॉमन यूएसबी टाइप सी चार्जर आणण्यास मंजुरी दिली आहे. इ-कचरा कमी करणं हा यामागचा मुख्य हेतू असल्याचे दिसून येते. या योजनेमुळे वापरकर्त्यांना लॅपटॉप, स्मार्टफोन, नोटबुक किंवा इतर उपकरणांसाठी वेगवेगळा चार्जर बाळगण्याची आवश्यकता भासणार नाही.

सध्याच्या स्थितीत आपण कुठलंही इलेक्ट्रॉनिक उपकरण खरेदी करण्यासाठी गेलो की त्यासोबत चार्जर येतोच. मग तो लॅपटॉप असो किंवा स्मार्ट फोन. जर हा चार्जर खराब झाला तर नवा चार्जर घेण्यासाठी पैसेही मोजावेच लागतात. लॅपटॉपचा चार्जर बिघडला तर वेगळा खर्च, मोबाइलचा चार्जर बिघडल्यास वेगळा खर्च या गोष्टी होतात. त्यामुळेच आता सगळ्या उपकरणांसाठी एकच कॉमन चार्जर जो USB Type C असणार आहे तो आणण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. इ-कचरा कमी करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे.

१ ) नव्याने येणाऱ्या स्मार्ट फोन्ससाठी टाइप सी चार्जर ही सामान्य बाब असून चार्जर फास्ट होते.
२) फोनही लवकर चार्ज होतो.
३) चार्जरच्या केबलने डेटा ट्रान्सफरही करता येतो.
४) जुन्या चार्जरची आणि टाइप सी चार्जरची तुलना केली तर हा चार्जर छोटा आणि पातळ आहे.
५) चार्जरच्या मदतीने फोन किंवा टॅब लवकर चार्ज करता येतो.
६) नवा चार्जर २० व्हॅट पॉव पेक्षा जास्त ट्रान्सफरचा असतो.
७) दीर्घ काळ बॅटरीचा वापर होणारे फोन काही मिनिटांमध्ये चार्ज होऊ लागतो. USB Type C फक्त फास्ट चार्जिंग करतो असं नाही तर डेटाही जलदगतीने ट्रान्सफर करतो. मायक्रो USB मधून ४५० एमबी प्रति सेकंद डेटा ट्रान्सफर होतो. तर USB Type C केबमधून १०, २०, ४० किंवा ८० जीबीपीएस च्या स्पीडने डेटा ट्रान्सफर करता येतो.

Team Global News Marathi: