नागपूर अधिवेशनापूर्वी शिवसेनेच्या एकाच कार्यालयाचे बनले २ भाग

नागपूर | महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. नागपूरात सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. महागाई, बेरोजगारी आणि महापुरुषांचा अपमान यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करणार आहेत. तर सत्ताधारीही विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. त्यात शिवसेनेच्या २ गटांमध्ये यंदाच्या अधिवेशनात पुन्हा वाद उफाळून येणार आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनानिमित्त शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट दोन्ही आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे कार्यालय कुणाला द्यायचे असा प्रश्न सगळ्यांना पडला होता त्यावर तोडगा म्हणून आता कार्यालयाचे २ भाग बनवण्यात आले आहे. त्यामुळे एकाच कार्यालयात शिंदे-ठाकरे गटाचे आमदार शेजारी शेजारी बसणार आहेत. राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला यावरून वाद पेटला होता.

ठाकरे गटाने कार्यालयावर ताबा मिळविला होता. नागपुरातही हाच प्रकार घडला. आपल्या आमदारांना बसण्यासाठी माझे कार्यालय आहे. आपल्या मंत्र्यांची देखील कार्यालय आहेत. त्यामुळे संघर्ष कशाला अशी समजूतदारपणाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या अधिवेशनात घेतली होती आणि वाद टाळला होता. तीच भूमिका यावेळी देखील ते घेतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयाबाहेर २ पाट्या लावण्यात आल्या आहेत.

Team Global News Marathi: