शाइफेकीनंतर समता सैनिक दलाच्या दोघांना तर वंचितच्या एका सदस्याला अटक

 

पुणे | मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरीत एका कार्यक्रमाला जात असताना शाईफेक करण्यात आली असून महाराष्ट्रात झुंडशाही सुरु असून, हिंमत असेल तर समोर या, असं आव्हान काल (शनिवारी) चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची नावं समोर आली असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मनोज घरबडे यानं दोन साथीदारांसह शाईफेक केली असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरुन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल (शनिवारी) पिंपरीमध्ये शाईफेक करण्यात आली. शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्याच्या इतर दोन सहकाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं. चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांमध्ये मनोज घरबडे आणि त्याच्या दोन साथीदारांचा समावेश होता. विजय ओव्हाळ आणि धनंजय ईचगज यांचाही शाईफेक करण्यात सहभाग होता.

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील पिंपरी दौऱ्यावर असताना झालेल्या शाईफेक प्रकरणी समता सैनिक दल संघटनेच्या दोन कार्यकर्त्यांना, तसेच वंचित बहुजन आघाडीच्या पिंपरी चिंचवड सचिवांना अटक करण्यात आली आहे. समता सैनिक दलाचे संघटक आरोपी मनोज भास्कर घरबडे, समता सैनिक दल सदस्य धनंजय भाऊसाहेब ईचगज आणि वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओवाळ यांना हे कृत्य केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

Team Global News Marathi: