मुंबईः बॉलिवूड मधील सेलिब्रेटी, सेलिब्रेटी किड्स सोशल मीडीया वर चांगलेच अॅक्टीव्ह असतात. आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या गोष्टी, भल्याबुऱ्या गोष्टी ते चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असतात. नुकतचं प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याची मुलगी ईरा खान हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरुन एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओत तिने तिचा लैगिक छळ झाल्याचा धक्कादायक खुलासा केला.
वयाच्या १४व्या वर्षी झाला लैंगिक छळ!
न कळत्या १४व्या वर्षी एका इसमाने ईरा खान हिचा लैंगिक छळ केला. व्हिडीओत ईरा खान सांगते की, त्यावेळी तो इसम नेमकं काय करतोय हे समजत नव्हतं, पण साधारण वर्षभरानंतर आपल्यासोबत काय प्रकार घडलाय हे कळलं. आज ती गोष्ट आठवली की मन शहारतं आणि खूप राग येतो की मी असं घडू कसं दिलं! पण माझ्या आई बाबांनी ह्यातून मला बाहेर पडायला मदत केली, असं तिने स्पष्ट केलं.
चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये
१० ऑक्टोबर ला म्हणजेच ‘वर्ल्ड मेंटल हेल्थ डे’ निमित्ताने ईराने आपल्या डिप्रेशन बद्दल सांगणारा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिला लोकं विचारत असतात की ती डिप्रेशनमध्ये का आहे? पण ह्या बाबतीत तिलाही माहिती नसल्याचं तिनं सांगितलं. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून ती डिप्रेशनमधून बाहेर पडतेय अशी माहिती इराने व्हिडीओच्या माध्यमातून दिली.
आई-वडिलांचा घटस्फोट
वडील आमिर खान आणि आई रिना दत्ता यांच्या घटस्फोटाबाबतही ती तिच्या व्हिडीओमध्ये मोकळेपणाने बोलली. आई-वडिलांच्या घटस्फोटानंतरही ते दोघे चांगले मित्र असल्याचं तिने सांगितलं. आमिर खान आणि रिना दत्ता हे दोघेही तिला डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी मदत करतायत, ईराला सध्या कुठलीही आर्थिक चिंता नाहीये