मालिका पुढे चालत राहावी एवढीच आमची इच्छा, मानेंच्या भेटीनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

 

मुंबई | मुलगी झाली हो या कार्यक्रमातुन बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेले अभिनेते किरण माने यांनी आज राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली या भेटीनंतर आव्हाड म्हणाले की, “मुलगी झाली हो ही मालिका पुढे चालत राहावी एवढीच आमची इच्छा आहे. प्रोडक्शन हाऊसला माहिती नाही, असंच होऊ शकत नाही. मी एकदा भूमिका घेतली की त्यातून पाय मागे घेतो, असं माझ्या ३५ वर्षांच्या राजकीय आयुष्यात झालेलं नाही असे त्यांनीं यावेळी बोलून दाखविले होते.

मराठी कलाकरांचे बॅकग्राउंड बघा. अचानक तुम्ही सांगाल, जा रे घरी बसा. ज्यांना गरीबी माहिती आहे अशातला मी एक आहे. बापाची नोकरी गेल्यानंतर माझी आई तीन वर्ष सायकल चालवून जायची आणि शिवणकाम करायची. मी एका गरीबाची बाजू घेतोय. किरण मानेचा बाप आज आजारी पडलाय. भांडणं मिटवा, एकत्र राहा”, अशी भूमिका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?

स्त्री कलाकारांनी किरण माने यांची बाजू घेतली आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, एका स्त्रीने त्यांच्यावर आरोप केला आहे. बाकीच्या स्त्रियांनी त्यांची बाजू घेतली आहे. या प्रकरणाला दुसरा कसलाही रंग न लावता प्रोडक्शन हाऊस आणि चॅनलने एकत्र बसावं.

हा तिढा सोडवावा आणि कोणावर अन्याय होणार नाही, अशी भूमिका चॅनलने घ्यावी”, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केलं. “दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की, ठिक आहे मी प्रोडक्शन हाऊसला घेऊन येतो. आपण बसूया. उद्या-परवा मिटिंग होईल.

सतीश राजवाडे यांनी आपल्याला काही माहितीच नाही, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांना प्रोडक्शन हाऊसकडून समजलं, असं सांगितलं. पण प्रोडक्शन हाऊसने जे तुम्हाला कळवलं तेच किरण माने यांना कळवण्याचा प्रयत्न झाला का? तर त्यावर ते माहित नाही म्हणाले असं आव्हाडांनी सांगितलं.

Team Global News Marathi: