अविनाश भोसले यांची लंडनमध्ये प्रॉपर्टी, घोटाळ्याचे ३०० कोटी गुंतवल्याचा CBI चा दावा

 

पुणे | कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांनी या घोटाळ्याच्या पैशांतूनच लंडनमध्ये मोठी मालमत्ता खरेदी केल्याचं म्हंटल आहे. सीबीआयच्या आरोपपत्रातून ही माहिती उघड झाली आहे. बहुचर्चित येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेल्या आरोपात ही माहिती उघड झाली आहे.

या आठवड्यात सोमवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयात अविनाश भोसले यांच्याविरोधात हे आरोप पत्र दाखल करण्यात आलं होतं. या आरोपपत्रातील माहिती नुकतीच उघड करण्यात आली. अविनाश भोसले यांनी लंडनमध्ये एक संपत्ती खरेदी करण्यासाठी डीएचएफएलकडून मिळालेल्या ५५० कोटी रुपयांपैकी ३०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक झाली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.

तसेच ईडीनेही त्यांचा ताबा घेतला होता. सीबीआयनं जो तपास केला आहे तो डीएचएफल संबंधित होता. या प्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, अविनाश भोसले यांनी लंडनमध्ये जवळपास १००० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. त्यापैकी ३०० कोटी रुपये त्यांनी स्वतः भरले होते. 700कोटी डीएसएफल बँकेचं कर्ज आहे. ते कर्ज मंजूर करून घेतलं होतं. फ्लोरा डेव्हलपमेंट नावाची त्यांची कंपनी आहे. त्या कंपनीच्या खात्यात येस बँकेनं कर्ज वळतं केलं होतं,असं सीबीआयनं आरोपपत्रात म्हटलं आहे.

सेन्सेक्स ६०३ अंकांनी वधारला, निफ्टीनं १७ हजार अंकांचा टप्पा ओलांडला

सोनिया गांधींनी स्मृती इराणींना धमकावलं, निर्मला सीतारमण यांचा आरोप

Team Global News Marathi: