सेना- भाजप मधील नात अमीर खान आणि किरण राव यांच्यासारख – संजय राऊत

 

शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार आशिष शेलार यांच्या भेटीवर राज्यातील वातावरण चांगलेच तापू लागले होते. त्यातच सेनेशी आमचं कोणतंही शत्रुत्व नाही. आमचे केवळ वैचारिक मतभेद आहेत असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल होत.

आता फडणवीसांनी केलेल्या विधानाबाबत जेव्हा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत याना विचारलं असता त्यांनी आपल्या रोखठोक शैलीत उत्तर दिले. सेना- भाजप मधील नात अमीर खान आणि किरण राव यांच्यासारख आहे असं संजय राऊत यांनी म्हंटल.

संजय राऊत म्हणाले, आता आमीर खान आणि किरण राव यांच पहा. रस्ते वेगळे झाले आहेत पण मित्र आहेत. आमचे मार्ग बदलले आहेत, पण मैत्री कायम आहे. राजकारणात मैत्री कायम राहील. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवणार असा नाही,’ असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

शिवसेनेशी वैचारिक मतभेद आहेत, शत्रुत्व नाही, असे सूचक विधान करीत राजकारणात परिस्थितीनुसार निर्णय होतात आणि जर-तरला कोणताही अर्थ नसतो, असं प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केलं होत. यावरच खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांना टोला लगावला होता.

Team Global News Marathi: