मुंबईतील शाळा पुढल्या वर्षीच उघडणार…

मुंबईतील शाळा पुढल्या वर्षीच उघडणार

*मुंबई* – गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा केव्हा सुरू होणार याची धाकधूक विद्यार्थ्यी आणि पालकांना लागली आहे.सरकारच्यावतीने कोरोना पार्श्वभूमीवर शाळा सुरू करणे बाबत मोठी खबरदारी घेतली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोना संक्रमणाचा प्रभाव वाढू लागल्याचे पाहायला मिळत आहे. jत्यामुळे वाढत्या कोरोनाचा धोका ओळखून शाळा करून सुरू करण्याबाबत सरकारच्या वतीने आस्तेकदम भूमिका घेतली जात आहे. दरम्यान ३१ डिसेंबर पर्यंत मुंबईतील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

दरम्यान महाराष्ट्र राज्यात नववी ते दहावी शाळा वर्ग सुरू करण्याचे जोरदार तयारी सुरू आहे. मात्र आता वाढत्या कोरोना संक्रमणाचा धोका ओळखून मुंबई महापालिका क्षेत्रात ३१ डिसेंबर पर्यंत शाळा बंद ठेवण्याचा घेण्यात आलेला निर्णय, सर्वांनाच विचार करायला लावणार आहे.थंडीच्या काळात कोरोना संक्रमणाचा वाढता धोका ओळखून, महाराष्ट्र शासनाने राज्य भरातच पुन्हा एकदा कोरोना विरुद्ध लढण्यासाठी तयारीचे आदेश दिले आहेत. आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: