‘सव्वापाच वाट्या सोमय्या, साडेतीन चमचे चंद्रकांतदादा आणि… असे बनतात चविष्ट संजय राऊत’

 

 

अभिनेता किरण माने आपल्या बेधडक आणि रोखठोख बोलीसाठी प्रसिद्ध आहे. जिथे अनेक कलाकार आपलं राजकीय मत मांडायला कचरत असतात तिथे हा अभिनेता सडेतोड पद्धतीने आपलं मत मांडताना दिसतो. स्वतःला कोणत्याही पक्षाचा न म्हणवणारा, कोणाचीच बाजू न घेता प्रत्येक बाजूंवर मत मांडणारा किरण माने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी सुद्धा कारण आहे त्याने केलेलं एक वक्तव्य. किरण एका मोठ्या कॉंट्रोव्हर्सीचा  भाग होऊन गेला. पण त्यातूनही न डगमगता तो फेसबुकवर आपली मतं बेधडकपणे मांडताना दिसतो.

 

त्याच्या पोस्ट ह्या अनेकदा राजकारण, पक्ष, समाज, कार्यकर्ते या धाटणीच्या असतात. त्याने एका पोस्टमध्ये आपल्या पॉलिटिकल सिनेमाचं काम चालू आहे असा उल्लेख सुद्धा केला होता. त्यामुळे त्याचा राजकारणावर बारीक अभ्यास किंवा लक्ष असतं असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. सध्या त्याने शिवसेना नेते संजय राऊत  यांच्यावर निशाणा साधत एक मत मांडलं आहे.

 

साधारणपणे सव्वापाच वाट्या किरीट सोमैय्या, साडेतीन टेबलस्पून चंद्रकांतदादा, अर्धा चमचा उपाध्ये किंवा वाघताई – दोघांपैकी जे हाताशी असेल ते.. वरून चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे.. याचं मिश्रण एकजीव करून खरपूस तळलं की एक चविष्ट ‘संजय राऊत’ तयार होतात !’ असं वक्तव्य एका फेसबुक पोस्टमार्फत किरण माने करताना दिसत आहे.

Team Global News Marathi: