सत्यजित तांबेंकडून पराभूत झालेल्या शुभांगी पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

 

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. याठिकाणी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहे. तांबे यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना पराभूत केले. पराभवानंतर पाटील यांची प्रतिक्रिया दिली आहे.मी पहिल्यांदा निवडणूकीत उभी राहिली होती, मला 35 हजार मतं पडली आहेत. त्यामुळे ही मतं विकली गेली नव्हती,असा शब्दात पाटील यांनी अप्रत्यक्षपणे तांबे यांच्यावर निशाणा साधला. हा विजय धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा झाला आहे, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचे काही जण म्हणत होते, मात्र या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना जनतेने घाम फोडला या निवडणुकीमध्ये मी पराभूत झाले असले तरी आता आता मला शिक्षकांसाठी मोठे आंदोलन करायचे आहे. आता माझी खरी लढाई सुरू झाली आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी काल (गुरुवारी) रात्री अधिकृत निकाल जाहीर केला. यात .सत्यजित तांबेंना ६८,९९९ मते मिळाली आहे,तर शुभांगी पाटील या २९,४६५ मतांनी पराभूत झाल्या आहेत.

या निवडणुकीत सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडीच्या या निर्णयानंतर भाजप सत्यजित तांबे यांना पाठिंबा देणार का, याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती, मात्र भाजपने शेवटपर्यंत आपली भूमिका जाहीर केली नाही. गुरुवारी रात्री १० वाजता सत्यजित तांबे यांचे मतमोजणी केंद्रावर आगमन होताच समर्थकांनी त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा केला.

Team Global News Marathi: